‘जनजातीय गौरव दिन’ उत्साहात
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त ‘जनजातीय गौरव दिन’ साजरा करण्यात आला. आदिवासी क्रांतीकारकांच्या शौर्य, संघर्ष आणि ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयकडून विशेष दीपोत्सव उपक्रम राबवण्यात आला. यादरम्याने आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा व पुतळ्यांची स्वच्छता करून परिसर स्वच्छ व सुशोभीत करण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाई व दीपप्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
फुटाळा परिसरातील क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा, गोंड राजे बख्त बुलंद शाह, वीरोराणा रानी दुर्गावती तसेच नारायणसिंह उईके यांच्या पुतळ्यांचा परिसर व कमल चौकात हा उपक्रम राबविण्यात आला. जल, जंगल, जमीन, समाजाचा स्वाभिमान व हक्कांच्या रक्षणासाठी दिलेला लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि क्रांतिकारकांच्या स्मृतिस्थळांचे संवर्धन व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. हा सप्ताह केवळ सांस्कृतिक उत्सवपुरता न ठेवता, आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरण, शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभ वाटप, आधार कार्ड शिबिरांचे आयोजन, आदिवासी लाभार्थ्यांना वनहक्क दाव्यांचे वाटप तसेच महिला बचत गटांसाठी स्वयंपरोजगार कार्यक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे आदिवासी कुटुंब आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम होत असून महिलांना स्वयंपरोजगाराच्या संधी मिळत आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांचे संघर्षमय जीवन, सामाजिक परिवर्तनाची भूमिका और जल, जंगल, जमीन यांच्या संरक्षणारणासाठीचा लढा आजही आदिवासी समाजाला व नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून त्यांच्या विचारार्थांचा आणि कार्याचा व्यापक जागर केला जात असून, आदिवासी बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे सहभागी होत आहेत. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त आणि ‘जनजातीय गौरव दिना’चे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नागपूर यांच्याकडून दिनांक ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनजातीय गौरव सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, गौरवशाली इतिहास, परंपरा, कला और अस्मिता यांचा जागर करण्यात येत असून, विविध लोकाभिमुख उपक्रम राबविले जात असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी दिली.















