मोदी यांना दिले रशिया भेटीचे आमंत्रण
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : ब्रिक्स शिखर परिषदेच्या पृष्ठभूमिमीवर शुक्रवारी भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत व्यापार, ऊर्जा आणि संरक्षण या विषयांवर सखोल चर्चा झाली. यावेळी पुतिन यांनी मोदी यांना रशिया भेटीचे औपचारिक आमंत्रणही दिले.
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी स्नेहपूर्ण संबंध दाखवले. भारत मंडपम येथे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रध्यक्ष पुतिन यांनी हस्तांदोलन केले आणि एकमेकांना आलिंगन दिले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रध्यक्ष पुतिन यांना तमिळ संत आणि कवी तिरुवल्लुवर यांच्या ‘तिरुक्कुरल’ या पुस्तकाची रशियन आवृत्ती भेट दिली. पुतिन यांना ‘तिरुक्कुरल’ पुस्तक सादर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपले सांस्कृतिक संबंध दृढ करण्यात हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावेल. संत तिरुवल्लुवर यांनी या पुस्तकात मानवी जीवनाची अनेक वैशिष्ट्ये वर्णन केली आहेत.
तिरुक्कुरल हा ग्रंथ तमिळ साहित्यातील सर्वात महान आणि प्रसिद्ध ग्रंथांपैकी एक आहे. तो ‘तमिळ वेद’ म्हणूनही ओळखला जातो. तो सुमारे २००० वर्षांपूर्वी लिहिला गेला होता.
या द्विपक्षीय बैठकीत २०३० पर्यंत १०० अब्ज अमेरिकन डॉलरचे द्विपक्षीय व्यापारी लक्ष्य, रशियासोबत औद्योगिक सहकार्य वाढवणे, रेल्वे क्षेत्र आणि बोर्गाद बांधकामात सहकार्य, पोलाद मूल्य साखळीचा विकास; रशियन बाजारपेठेत प्रवेश वाढवणे, इंधन चक्र आणि जीवनचक्र समर्थनासह नागरी अणुऊर्जा सहकार्य मजबूत करणे, गतिशीलतामध्ये सहकार्य वाढवणे, रशियामधील भारतीय कुशल कामगारांची संख्या वाढवणे तसेच महत्त्वाच्या (पान ६ वर)








