हाय अलर्ट जारी ; सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शनिवारपासून दोन दिवस होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पृष्ठभूमिमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाच्या अल्र्टनंतर दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन निरीक्षण वाढवली आहे. काही संघटना किंवा गटांकडून व्हीव्हीआयपी नेत्यांच्या हालचालींमध्ये अडथळा आणणे, सुरक्षा व्यवस्थेत घुसखोरी करणे किंवा आंदोलनाच्या माध्यमातून परिषदेला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी अधिकाऱ्यांना भीती आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिंतींवर आक्षेपार्ह किंवा आंदोलनाशी संबंधित घोषणा लिहिणे, ड्रोन उडवणे तसेच व्हीव्हीआयपी मार्गावर घुसण्याचा प्रयत्न होण्याचा धोका आहे. त्यामुळे परिषद स्थळ, प्रमुख हॉटेल्स, व्हीव्हीआयपी मार्ग, महत्त्वाच्या सरकारी कार्यालये (पान ६ वर)
काँग्रेसमध्ये मतभेद
दरम्यान, ब्रिक्सच्या महत्वावरून काँग्रेसमध्ये वेगवेगळी मते समोर आली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ब्रिक्सच्या मागील परिषदांमधून भारताला ठोस फायदा झाला नसल्याचे मत व्यक्त केले, तर पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ब्रिक्स परिषद ही भारताच्या कूटनीतिक सामर्थ्याचे प्रदर्शन करणारी महत्त्वाची संधी असल्याचे म्हटले आहे. शशी थरूर यांनी ब्रिक्सच्या महत्त्वावर भाष्य करताना हा समूह ग्लोबल साऊथसाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. ब्रिक्समधील ११ देश जगाच्या मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात तसेच जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या सुमारे ४१ टक्के हिस्याचे प्रतिनिधित्व करतात, असे त्यांनी नमूद केले. या शिखर परिषदेच्या निमित्ताने सुमारे डझनभर राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुख भारतात येत असल्याने ही भारतासाठी प्रतिमेची बाब असल्याचेही थरूर यांनी सांगितले. विविध देशांना एकत्र आणण्याची भारताची कूटनीतिक क्षमता या परिषदेतून अधोरेखित होणार असल्याचे त्यांनी म्हटले.












