लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर व अजनी रेल्वे परिसर कार्यरत धारा रेल प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि विमा सुविधांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे नागपूर महानगर प्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृखाली करण्यात आलेल्या या आंदोलनातून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेढण्यात आले.
यावेळी नितीन तिवारी म्हणाले की, पूर्वीच्या कंत्राटदाराच्या काळात कामगारांना नियमानुसार वेतन मिळत होते हे स्पष्ट असताना, गेल्या सहा महिन्यांत अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की नवीन कंत्राटदार त्यांना कमी वेतन देत आहे? कामगारांचं देय रक्कम का कापली जात आहे आणि यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तिवारी यांनी असाही आरोप केला की, या संपूर्ण प्रकरणात रेल्वेचे काही संबंधित सोएनडब्लू/डेपो अधिकारी संगनमताने सामील असण्याचा संशय आहे, गेल्या सहा महिन्यांची उपस्थिती, गुणपत्रिका, वेतन देयके, पीएफ, ईएसआयसी आणि कंत्राटदाराच्या बिलान्छी निष्पक्ष चौकशी करावी आणि जर कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा कंत्राटदाराचा सहभाग उघड झाला, तर नियमानुसार कारवाई करावी. शिवसेना भूमिपुत्र आणि कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांवर ठाम आहे. शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारचा हवाला देत ते म्हणाले की, शेतकरी आणि मजूर या दोघांच्याही हिताचे रक्षण करणे आवश्यक आहे.
नितीन तिवारी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या महिन्यात नियमानुसार कामगारांच्या खात्यात पूर्ण पगार जमा झाला नाही किंवा कोणत्याही कामगाराला धमकी देऊन कामावरून काढून टाकले, तर शिवसेना आंदोलन अधिक तीव्र करेल आणि रेल्वे सेवा बंद पाडेल.
आंदोलन सुरू असताना, डीआरएम श्री विनायक गर्ग यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि एडीआरएम श्री पिंगळे यांना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचे आणि पात्र कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्याचे निर्देश दिले. संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले.












