लोकवाहिनी न्यूज
परभणी : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून मोठी दुर्घटना घडली. २० जून रोजी परभणी तालुक्यातील यशवाडी गावात ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. सभा मंडप कोसळल्याने या मलब्याखाली एकूण ३२ जण दबले गेले होते. या दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक प्रशासन व गावकऱ्यांच्या मदतीने ढिगारा हटवून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. शनिवार असल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी ही दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या काँक्रिटचा एक भाग कोसळला. शनिवार असल्याने सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. शनिवार असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने लोक पूजा आणि दर्शनासाठी सभामंडपाखाली रांगेत उभे होते, तेव्हा अचानक, एका मोठ्या आवाजासह, मंडपाचे मुख्य खांब वाकले. काँक्रिटचे जड छत थेट भाविकांवर कोसळले असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.











