३६.७३ कोटी मतदारांशी घरोघरी जाऊन संपर्क
लोकवाहिनी न्यूजनवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, या टप्प्यात महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार याद्यांचे पुनरीक्षण केले जाईल. या प्रक्रियेत हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख वगळता देशातील जवळपास सर्व भागांचा समावेश असेल.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, सध्या सुरू असलेले घरांच्या याद्यांचे तसेच जनगणनेअंतर्गत कार्यरत असलेली कॉमन फील्ड यंत्रणा लक्षात घेऊन एसआयआरच्या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे. त्यानुसार ३.९४ लाखांहून अधिक बूथ स्तरावरील अधिकारी ३६.७३ कोटी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी घरोघरी जातील.
तिसऱ्या टप्प्यात ओडिशा, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर, दमण दीव, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, मेघालय, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये एसआयआरचे काम सुरू होणार आहे.








