लोकवाहिनी न्यूजपुणे : काही महिन्यांपूर्वी घडलेल्या गाजलेल्या पोरशे अपघात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरवून टाकले होते. आता हेच प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांनी दावा केल्याचा असलेला एक सेलिब्रेशन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे नव्याने वाद निर्माण झाला असून, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुण्यात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या गाजलेल्या पोरशे अपघात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. भरधाव वेगाने धावणाऱ्या लक्झरी पोरशे कारने दोन निष्पाप तरुणांचा जीव घेतल्यानंतर, या प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. या दुर्घटनेनंतर कायदा, पोलिस व्यवस्था, श्रीमंतांना मिळणारी विशेष वागणूक आणि न्यायव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने केलेल्या कथित सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीचा पार्टीतील बेधुंद अंदाज पाहायला मिळत आहे. दोघेही मोठ्या आवाजात सुरू असलेल्या गाण्यांवर नाचताना दिसून, त्यांच्या गळ्यात नोटांचे हार घालण्यात आलेले दिसतात. मुंबई से आया मेरा दोस्त या लोकप्रिय हिंदी गाण्यावर अग्रवाल कुटुंबीय आणि त्यांचे जवळचे नातेवाईक जल्लोष करताना दिसत आहेत. एका व्यक्तीने विशाल अग्रवाल यांना खांद्यावर उचलल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला आणि आरोपींच्या कुटुंबात जल्लोष सुरू आहे, अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.










