एशियन गेम्समध्ये दुसऱ्या दिवशी चार पदके : हिमांशू-रुद्रांशची नेमबाजीत चमक, सुचिकाने एमएमएमध्ये रचला इतिहास
लोकवाहिनी न्यूज
नागोया : एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची कमाई सुरूच आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदके जिंकली. नेमबाजीमध्ये भारताला दोन पदके मिळाली, तर मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तरियालने कांस्यपदक पटकावले. याशिवाय भारतीय महिला हॉकी संघाने सलग दुसरा मोठा विजय मिळवला. टेबल टेनिसमध्येही महिला आणि पुरुष संघांनी पाकिस्तानचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
नेमबाजांची शानदार कामगिरी
पुरुषांच्या १० मीटर एर रायफल व्यक्तिगत स्पर्धेत भारताच्या हिमांशू ढिल्लनने रौप्यपदक, तर रुद्रांश पाटीलने कांस्यपदक जिंकले. हिमांशूने अंतिम फेरीत २५२.४ गुण मिळवत दुसरे स्थान मिळवले. रुद्रांशने २३०.९ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
रुद्रांशने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी करत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले होते. मात्र, चीनच्या शेन लिहाओने शेवटच्या टप्प्यात शानदार पुनраगमन केले. त्यानंतर रुद्रांशचा एक शॉट ९.७ गुणांचा ठरला आणि तो तिसऱ्या स्थानावर घसरला. त्याने पुन्हा आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी हिमांशू आणि रुद्रांश यांनी पुरुषांच्या १० मीटर एर रायफल सांघिक स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते. या संघात पार्थ मानेचाही समावेश होता. त्यामुळे एशियन गेम्समध्ये हिमांशू आणि रुद्रांश यांच्या खात्यात प्रत्येकी दोन पदके जमा झाली आहेत.
सुचिका तरियालला कांस्यपदक
भारताच्या सुचिका तरियालने महिलांच्या ६० किलो एमएमए स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. उपांत्य फेरीत तिची लढत सिंगापूरच्या तेओ हुई हूनविरुद्ध झाली.













