मतचोरीच्या मुद्द्यावरून मल्लिकार्जुन खर्गे यांची मागणी
लोकवाहिनी न्यूज
आज संपूर्ण देश बेकायदेशीर निवडणुकांवर चालत आहे. मोदी हे बेकायदेशीर पंतप्रधान आहेत, शाह हे बेकायदेशीर मंत्री आहेत आणि कुठेही निवडून आलेले सर्व मुख्यमंत्री बेकायदेशीर निवडून आलेले आहेत. त्यामुळे सर्व राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा विसर्जित करून निवडणुका घेतल्या पाहिजेत आणि त्या मतपत्रिकेद्वारेच घेतल्या पाहिजेत, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी येथे केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना खर्गे म्हणाले की, आज संपूर्ण देश अवैध निवडणुकांच्या आधारावर चालवला जात आहे. मोदी हे एक अवैध पंतप्रधान आहेत, शाह हे एक अवैध मंत्री आहेत आणि जिथे जिथे मुख्यमंत्री निवडून आले आहेत, ते सर्व अवैध आहेत. लोकसभा आणि राज्य विधानसभा विसर्जित करून मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेतल्या पाहिजेत. ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याचा आरोप खर्गे यांनी केला.
त्यांनी दावा केला की, मतदारांच्या सध्या सुरू असलेल्या विशेष सधन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेत अनेक त्रुटी असून, ती लोकशाहीला कमकुवत करत आहे. ते म्हणाले की, विरोधी पक्ष एसआयआर प्रक्रियेविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेच्या गैरवापराविरोधात आपले देशव्यापी आंदोलन सुरूच ठेवेल. काँग्रेस अध्यक्षांनी ३० सप्टेंबर रोजी झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचा उल्लेख केला, यात २० पक्षांचे सदस्य आणि त्यांच्या कायदेशीर कक्षांचे प्रतिनिधि उपस्थित होते. ते म्हणाले की, एसआयआर देशाला चुकीच्या दिशेने नेत आहे आणि गरीब, अशिक्षित, कामगार आणि विशेषतः अल्पसंख्यांकांवर प्रतिकूल परिणाम करत आहे, यावर सर्वांचे एकमत झाले. एका मतदान केंद्रातून ५०० मते काढून टाकल्यास कसल्या मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका? असा प्रश्न खर्गे यांनी विचारला. आता नावे जोडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस अध्यक्षांनी असा आरोप केला की, अनेक लोक, विशेषतः भाजप आणि आरएसएसचे सदस्य, ज्या वार्ड, पंचायती आणि गावांमध्ये मतदारांची नावे काढून टाकायची आहेत (पान ६ वर).
मोदी-शाहने लोकशाहीची हत्या केली
मोती आणि त्यांच्या लोकांनी लोकशाही नष्ट करणारा कायदा केला आहे. सर्वप्रथम, त्यांनी समितीची रचना बदलली. पूर्वीच्या पद्धतीनुसार, सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान हे समितीचे सदस्य होते. मोदी आणि शाह यांनी लोकशाहीची हत्या केली, असा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला












