धानाची बांधी ते ब्रिटनपर्यंतचा प्रवास
लोकवाहिनी न्यूज
गडचिरोली : घरातील कर्त्या व्यक्तीच्या आजारपणांमुळे आर्थिक आणि कौटुंबिक संकट ओढवले. आईची प्रकृती खालावली. पुढे आईचे निधन झाले. मात्र, या सगळ्या परिस्थितीत शिक्षणाची वाट थाम्बली नाही. काका-काकूंनी आधार दिला, बहीण खंबीरपणे पाठीशी उभी राहिली, शिक्षक आणि मित्रांनीही प्रसंगची आर्थिक मदत केली. याच बळावर एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील आकाश मिरवा कुळयेटी याने गडचिरोलीपासून सुरू केलेला शिक्षणाचा प्रवास आता ब्रिटेनपर्यंत नेला आहे, ब्रिटेनमधील ब्रिस्टल विद्यापीठात आकाशाव्यान अभियांत्रिकी विष्यातील पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याची निवड झाली असून, सध्या तो तिथे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे, तंत्रज्ञानाच्या या प्रवासासोबतच स्वतःच्या प्रयत्नातून कला शिकत गडचिरोलीच्या निसर्गाला कलाकृतींच्या माध्यमातून आकार देण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे.
आकाशचे वडील मिरवा मासा कुळयेटी १९८९ मध्ये पोलिस दलात भर्ती झाले. काही वर्षे सेवा बजावल्यानंतर २००३-०४ च्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मानसिक आजाराचा सामना करावा लागला. त्यावेळी आकाश आणि त्याची बहीण अश्विनी दोन्ही लहान होते.
मुलांच्या शिक्षणावर या परिस्थितीचा परिणाम होऊ नये म्हणून आई कमल यांनी दोन्ही मुलांना सांभाळले. मात्र, पुढे त्यांचीही प्रकृती खालावली. आकाशाने बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१९ मध्ये आईचे निधन झाले.
या कठीण काळात दोन्ही काका-काकूंनी भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. स्वतःच्या मुलांप्रमाणे आकाश आणि अश्विनीची काळजी घेतली. आजही सर्व कुटुंबातील तब्बल १४ सदस्य एकत्र राहतात. वडिलांच्याही कुटुंबीयांकडून काळजी घेतली जाते. आकाशची बहीण अश्विनी हिने बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पदवीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण केले. प्रकृतीच्या कारणामुळे तिला पुढील शिक्षण सोडावे लागले. सध्या ती हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात नौकरी करीत असून, आकाशच्या शिक्षणासाठी तिनेही आर्थिक मदत केली.
बारसेवाड्यासारख्या दुर्गम गावात आकाशचे बालपण गेले. कुटुंबाची शेती म्हणजे मुख्यतः धानाचे पीक. सुट्टतीच्या काळात शिक्षणासोबत तो शेतातही काम करायचा. मात्र, पुढे शिकण्याची जिद्द कायम होती. दहावीनंतर त्याने नागपूर गाठले. बारावीनंतर धरमपेठ तज्निकेतनात विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊन विमान व अवकाश अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. विमान, रॉकेट, उपग्रह आणि अंतराळयानांची रचना, निर्मिती व तंत्रज्ञानाचा अभ्यासची ओढ त्याला पुढे ब्रिटेनपर्यंत घेऊन गेली. ब्रिटेनमध्ये शिक्षण घेतलेल्या अडोकेट्रे प्रबाताडम यांच्या मार्गदर्शनातून त्याला पुढील शिक्षणाच्या संधीची माहिती मिळाली. त्यातून ब्रिस्टल विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणाची वाट खुली झाली.
आकाशाच्या प्रवासातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची कला. त्याने कोणत्याही कलाशिक्षकाकडून औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही. निरीक्षण, प्रयोग आणि स्वतःच्या प्रयत्नातून त्याने चित्रकला आणि कलाानिर्मितीची साधना केली. काड्या, वाळलेली पाने आणि निसर्गातील विविध घटकांचा वापर करून तो कलाकृती साकारतो. गडचिरोलीच्या जंगलकडडे, झाडांकडे, पानांकडे आणि निसर्गातील साध्या घटकाकडे पाहण्याची त्याची दृष्टीच त्याच्या कलेत उतरते. एकीकडे अवकाशयानांच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास, तर दुसरीकडे गडचिरोलीच्या माटीतून आणि निसргаतून उगमणारी कला- आकाशच्या प्रवासासोबत हीच अनोखी सांगड आहे. शिक्षणासाठी गडचिरोली सोडले, नागपूर गाठले आणि आता ब्रिटेनमध्ये पोहोचले; मात्र आकाशाची आपल्या मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. कुटुंबाने दिलेला आधार, शिक्षक-मित्रांनी केलेली मदत आणि प्रतिकूल परिस्थितीतही साथ न सोडणारी बहीण यांना तो आपल्या प्रवासाचा श्रेय देतो. बारसेवाड्याच्या धानाच्या शेतातून सुरू झालेला आकाशाचा प्रवास आज अवकाशयान अभियांत्रिकीच्या अभ्यासपर्यंत पोहोचला आहे. आकाशायला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाच्या हातात मात्र अजूनही गडचिरोलीच्या मातीचा गंध आणि निसर्गाला कलात्मक आकार देणारी कुंचल्याची ओढ कायम आहे.











