नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या २०२६च्या निवडणुकीसाठी प्रा. अनिल सोले यांनी आज उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी १.३० वाजता त्यांनी आपला अर्ज सादर केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रा. सोले यांनी मंदिरात जाऊन ईश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी सुनील अग्रवाल, प्रकाश लोणारे, विलास त्रिवेदी आणि बाळासाहेब कुलकर्णी, ॲड. लांजेवार, डॉ. सत्यवान मेश्राम, प्रतीक घोडे आणि डॉ. श्याम पुंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रा. सोले यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत नागपूर विभागाचा सर्वांगीण विकास आणि पदवीधरांच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, शिक्षण, कौशल्यविकास तसेच पदवीधरांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
पदवीधरांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे प्रा. सोले यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा देणाऱ्या पदवीधर मतदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांचे त्यांनी आभार मानले, पदवीधरांचा विश्वास आणि पाठिंबा हीच आपली खरी ताकत असून, त्यांच्या प्रश्नांसाठी सततने प्रयत्न करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
दशरथ मस्के, सुनील श्रीवास, दिलीप जाधव, सुरेश सवाई, दीपक अरोरा, राजु बाबरा, ॲड अडतानी, चंद्रकांत रोठे, जयंत आदमने, अनूप पाटील, सतीश यादव, वंदना कोथळे, श्रीमती हनोटे यांची उपस्थिती होती.













