नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते हवाई दल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर दीक्षित हे या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेतील. संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला गती देण्यासाठी आणि स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान ‘एलसीए तेजस’सह इतर देशांतर्गत विमान प्रकल्पांना बळ देण्यामध्ये एअर मार्शल दीक्षित यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या नियुक्तीमुळे देशाच्या हवाई संरक्षण सज्जतेत स्वदेशी तंत्रज्ञानाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. आशुतोष दीक्षित यांचा जन्म ९ डिसेंबर १९६६ रोजी झाला. ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत त्यांची नियुक्ती झाली.
October 7, 2026
0 Comment
2 Views
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख
by Digital Desk
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते हवाई दल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर दीक्षित हे या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेतील. संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला गती देण्यासाठी... Read More













