वंजारी, सुधाकर कोहले मैदानात, पदवीधरमध्ये तिरंगी लढत
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाचे माजी आमदार अनिल सोले यांचे बंड शमविण्यात भाजपाच्या नेत्यांना अपयश आल्याने सोले यांच्यामुळे भाजप उमेदवार कोहळेंची धाकधूक वाढली आहे. सोले यांनी बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. भाजपाचे अधिकृत उम्मीदवार सुधाकर कोहले आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांच्यासोबत सोलेही निवडणुकीच्या रिंगणात कायम असल्याने आता तिरंगी सामना रंगणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी, ९ ऑक्टोबर रोजी ५४ पैकी १६ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता एकूण ३८ उम्मीदवार निवडणूक रिंगणात आहेत. माघारीच्या प्रक्रियेनंतर प्रमुख लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी भाजपमधील अंतर्गत संघर्षामुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.
भाजपचे कार्यकर्ते आणि लोकजागृती मंचचे रमण सेनाड, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. शिवाजी सोनरे तसेच भंडारा येथील आल्हाद भांडारकर यांच्यासह १६ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, अनिल सोले यांची माघार घडवून आणण्यात भाजप नेतृत्वाला यश आले नाही.
पक्षाने अधिकृत उम्मीदवार सुधाकर कोहले यांना दिल्यानंतरही सोले यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवल्याने भाजपसमोर मतविभाजनाचे आव्हान उभे राहिले आहे. सोले यांना मिळणार पदवीधर मतदारसंघाचा पाठिंबा आणि त्याचा कोहले यांच्या मतांवर होणारा संभाव्य परिणाम याकडे आता राजनीतिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे अभिजीत वंजारी या संघर्षाचा कसा फायदा उठवतात, यावरही निवडणुकीचे समीकरण अवलंबून राहणार आहे. या निवडणुकीत भाजपमधील दुहीही स्पष्ट होणार आहे. प्रा. सोले यांच्या पाठीमागे भाजपचा एक गट कार्यरत असून रसदही मिळत आहे.
संदीप जोशींचे कोहळेंसोबत ‘हम साथ साथ है’
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी आमदार संदीप जोशी आणि माजी आमदार सुधाकर कोहले यांच्यात नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, संदीप जोशी यांनी या चर्चावर स्पष्टीकरण देत आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीत पक्षात सोपविलेली जबाबदारी पार पाडणार आहे. पक्षाच्या आदेशविरोधात कोणतेही काम करणार नहीं असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे दोन्ही नेत्यामधील नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
लोकवाहिनीशी ९ ऑक्टोबर रोजी दूरध्वनीवरून संवाद साधताना संदीप जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पदवीधर निवडणुकीत पक्षात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या निर्णयानुसारच आपण काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून संघटनात्मक पातळीवर जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये नागपूर शहर निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार संदीप जोशी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी संदीप जोशी आणि रमेश भंडारी, पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी श्रीकांत आगलावे, संजय बंगाले, अनिरुद्ध पालकर और किसन गावंडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी गिरीश पुराणिक and रामभाऊ आंबुलकर, दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी आमदार मोहन मते and देवेंद्र दसुते, उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी संदीप जाधव and मिलिंद माने, नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी आमदार कृष्णा खोपडे and प्रा. प्रमोद पेंडके यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिल सोलेंच्या उमेदवारीने धक्का बसला : बावनकुले
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. सोले हे शेवटपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे वाट न्हवते. त्यांची देहबोली आणि मिळणारे संकेतही तसे होते. मात्र, त्यांनी अखेर अर्ज दाखल केला, त्यानंतर त्यांची समजून काढून अर्ज मागे घेण्यासाठी सततपणे विनंती केली, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी दिली.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून भाजपमध्ये निर्माण झालेल्या पेचाबाबत बावनकुले यांनी भूमिका स्पष्ट केली. पक्षात उमेदवारीचा निर्णय हा पक्षाच्या पातळीवर होत असतो. आपल्यालाही एकदा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती, असे सांगत त्यांनी पक्षाच्या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित केले. उमेदवारी न मिळाल्यानंतरही पक्षाची भूमिका स्वीकारणे अपेक्षित असते, असा अप्रत्यक्ष संदेशही त्यांनी दिला.
प्रा. अनिल सोले यांच्यासोबत विधान परिषदेचे एक माजी आमदार पूर्ण झाली असल्याची माहिती बावनकुले यांनी दिली. नागपूर पदवीधर मतदारसंघातील सोले यांची उमेदवारी आणि अमरावतीतील शिक्षक मतदारसंघातील बंडखोरी, अशा दोन्ही आघाड्यांवर भाजपला नाराजांची समजून काढण्याची कसरत करावी लागत आहे. अधिकृत उमेदवारांच्या विनायसाठी पक्षांतर्गत समन्वय साधताना बंडखोरंची भूमिका काय राहते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.













