लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जे.एन.यू.) विद्यार्थिनीच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे खासदार आणि माजी प्राध्यापक बिमोल अकोइजम यांना नोटिस बजावली आहे. त्यांना १५ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हाजर राहण्यास सांगण्यात आले आहे. वसंत कुंज नॉर्थ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर नोटिस लावली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असून, तक्रारीशी संबंधित माहिती आणि पुरावे गोळा केले जात आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएनयूच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ११ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या आरोप नोंदवण्यात आले आहेत. वृत्तनुसार, मे महिन्यात किमान ११ विद्यार्थिनींनी अकोइजम यांच्याविरोधात लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या होत्या. विद्यार्थिनींच्या आरोपानुसार, बैठका किंवा इतर कार्यक्रमांच्या बहाण्याने त्यांना विद्यापीठ परिसरातील निवासस्थानी बोलावले जात होते. तेथे त्यांच्याशी कथितरीत्या गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही विद्यार्थिनींनी कानात अशलील आणि अनुचित टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. या तक्रारींची विद्यापीठाच्या अंतर्गत समितीने चौकशी केली होती. समितीने कठोर शिस्तभंगाची शिफारस केल्यानंतर जेएनयू प्रशासनाने ९ ऑक्टोबर रोजी अकोइजम यांना प्राध्यापक पदावरून बडतर्फ केले.
अकोइजम यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी या कारवाईला ‘विच हंट’ म्हटले होते. तसेच, त्यांच्याविरोधीतील पुरावे सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात अद्याप फौजदारी न्यायालयाचा अंतिम निर्णय झालेला नाही.
भापपने राहुल गांधीना विचारले प्रश्न
या प्रकरणावरून भाजपाने काँग्रेस आणि लोकसभातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. महिलांच्या हक्काबाबत आणि पितृसटक व्यवस्थेविरोधात भूमिका मांडणाऱ्या राहुल गांधी यांनी आपल्या खासदारविरोधात कारवाई केली नाही, असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे. १३ ऑक्टोबर रोजी भाजपच्या महिला मतदारसंघाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच, तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेची खात्री करण्याची विनंतीही राष्ट्रपतीकडे करण्यात आली, अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा रूपकुमारी चौधरी यांनी दिली. दरम्यान, दिल्ली पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणातील आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.














