आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांची घेतली भेट
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ८५ पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. खेळाडूंनी पंतप्रधानांना स्वाक्षरी केलेल्या जर्सी आणि हॉकी स्टिक्स भेट दिल्या तसेच शाल पांघरून त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी विशेषतः ४४ वर्षांनंतर महिलांच्या हॉकीमध्ये मिळालेल्या सुवर्णपदकाचे आणि भारतीय महिलांनी जिंकलेल्या ३८ पदकांचे कौतुक केले.












