सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती
लोकवाहिनी न्यूज
त्र्यंबकेश्वर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील कुशवर्त तीर्थ येथे आज सकाळी धार्मिक विधी आणि मंत्रोच्चाराच्या घोषात राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले.
ध्वजस्तंभाची माहिती
ध्वजस्तंभाची उंची ३१ फूट आहे. समुद्र मंथनाची संकल्पना ध्वजस्तंभावर साकारण्यात आली आहे. मंथनातून प्राप्त रत्ने ध्वजावर आहेत. खालील भागात श्री गणेशाची प्रतिमा साकारली आहे. सर्वात वरील भागात अमृत कलश धारी गरुडाची प्रतिमा आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन, विविध कामांचे सूक्ष्म नियोजन आणि विकासकामांची निर्धारित वेळेत पूर्तता यांना प्राधान्य देण्यात येत आहे.












