पचमढीला सहलीस गेलेल्या विद्यार्थ्यांवर दु:खाचा डोंगर
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पचमढी येथे माकडाने हिसकावलेली बॅग परत मिळवण्याचा प्रयत्न एका शिक्षकाच्या जीवावर बेतला. विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी नागपूरहून गेलेले विजय नायक हे छायाचित्र काढत असताना माकडाने त्यांची बॅग पळवली. ती परत मिळवण्यासाठी सुरक्षा कठडा ओलांडून पुढे जाताच त्यांचा तोल गेला आणि ते थेट १५० फूट खोल दरीत कोसळले. शुक्रवारी सकाळी सव्वासाहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे २० विद्यार्थ्यांच्या सहलीवर शोककळा पसरली आहे.
विजय नायक हे नागपूरहून २० शालेय विद्यार्थीयांच्या समूसह पचमढी येथे पर्यटनासाठी गेले होते. शुक्रवारी सकाळी सर्वजण प्रियदर्शिनी दृश्यस्थळावर गेले होते. यावेळी विजय नायक छायाचित्र काढत असताना अचानक माकडाने त्यांच्या सामानावर झडप घातली आणि बॅग पळवली. बॅग परत मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी सुरक्षा कठडा ओलांडला. याच वेळी त्यांचा तोल गेला आणि ते खोल दरीत कोसळले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिक घटनास्थलळी पोहोचले. मात्र, दरीची खोली आणि दुर्गम परिसरामुळे बचावकार्यात अडथळे आले. पोलिसांना सुमारे तीन किलोमीटर پای चालत घटनास्थलळी पोहोचावे लागले. त्यानंतर स्ट्रेचरच्या मदतीने मृतदेह वर आणण्यात आला. सकाळी साडेनऊच्या सुमारास बचाव पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. सुमारे साडेतीन तास हे बचावकार्य सुरू होते.
या सहलीत विजय नायक यांच्यासोबत त्यांचे वडीलही होते. शिक्षकाचा डोळ्यादेखत झालेला मृत्यू आणि अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे विद्यार्थी व सहप्रवाशांना मोठा धक्का बसला














