लोकवाहिनी न्यूज
जामसावळी : सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते गोविंदा यांनी मंगळवारी नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध धार्मिक आणि श्रद्धास्थान असलेल्या चमत्कारिक श्री हनुमान लोक, जामसावळी धाम येथे भेट देऊन श्री हनुमान्याचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चना करून श्री हनुमान्याचा आशीर्वाद घेतला.
जामसावळी धाम येथे आगमन झाल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने गोविंदा यांचे आत्मिय स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना श्री हनुमान्याची मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
गोविंदा यांच्या आगमनाची माहिती मिळताच मोठ्या संख्यने भाविक जामसावळी धाम येथे दाखल झाले. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गोविंदा यांची एक झलक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पूजा-अर्चनेदरम्यान गोविंदा यांनी जामसावळी धामच्या धार्मिक आणि आध्यात्मिक वैशिष्ट्यांची माहितीही घेतली. श्री हनुमान्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त करत त्यांनी धाममधील आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिमय वातावरणचे कौतुक केले.













