तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : प. पू. श्री प्रल्हाद महाराज (रामदासी) यांचा पुण्यतिथी महोत्सव यंदा गुरुवार, १२ नोव्हेंबर ते शनिवार १४ नोव्हेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
शंंकरनगर (पूर्व) येथील दांडगे ले-आऊटमधील प. पू. सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज उपासना केंद्र, १३, समर्पित येथे तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यामध्ये सामुदायिक नामजप, काकड आरती, अभिषेक, विष्णूसहस्रनाम, श्रीरामहृदय, भजन, उपासना, कीर्तन, पालखी सोहळा, गोपालकाला आणि कुरवंडी आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
महोोत्सवाचा प्रारंभ गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.४० वाजता सामुदायिक जपाने होईल. त्यानंतर ५.४५ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता पवमान अभिषेक, दुपारी १२ वाजता नैवेद्य व महाप्रसाद, सायंकाली ५ वाजता विष्णूसहस्रनाम व श्रीरामहृदय पठण, तर ५.३० वाजता उपासना होईल. रात्री ७.३० वाजता ह.भ.प. मोहनबुवा कुबेर यांचे गुलालाचे कीर्तन होणार असून, रात्री ९.४० वाजता गुलाल आणि १०.३० वाजता शेजारती होईल.
शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.४५ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजता अभिषेक, १० वाजता हरिहाट व विविध स्तोत्रांचे पठण, दुपारी १२ वाजता नैवेद्य व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता विष्णूसहस्रनाम व श्रीरामहृदय पठण, ५.३० वाजता उपासना आणि सायंकाळी ७ वाजता श्रींचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रात्री १०.३० वाजता शेजारतीने दिवसाच्या कार्यक्रमांची सांगता होईल.
शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.४५ वाजता काकड आरती व कुरवंडी, तर सकाळी ७.३० वाजता गोपालकाला होऊन तीन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होईल. या महोत्सवाच्या पर्वकाळात सामुदायिक नामजपाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. श्रीमहाराजांचे शिष्य, भक्त, प्रेमी आणि साधकांना नामस्मरण्याच्या या उपक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. साखрखेर्डा संस्थानच्या सूचनेनुसार ज्या सद्गुरु भक्तांना जपाचा संकल्प करावयाचा आहे, त्यांनी ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उपसनेपर्यंत आपली नावे व संकल्पित जपसंख्या आयोजकांकडे कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुण्यतिथी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रीमहमाराजांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
















