लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूरमध्ये भंगार घोषित केलेल्या हाइड्रो क्रेन मशीन्सचा बनावट नोंदणीद्वारे अवैध वापर केल्याचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने तीन हाइड्रो क्रेन जेसीबी मशीन्स जप्त केल्या असून या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाला अशी माहिती मिळाली की, दुसऱ्या राज्यातून भंगार घोषित केलेल्या मशीन्स एकाच नोंदणी क्रमांकाचा वापर करून अवैधपणे चालवल्या जात आहेत. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माऊंट लिटेरा शाळेजवळील प्लॉट क्रमांक २०४ वर छापा टाकला. त्यांना संशयास्पद अवस्थेत तीन जेसीबी मशीन्स आढळल्या.
तपासदरम्यान, मशीन्सच्या कागदपत्रामध्ये तफावत आढळून आली. आरोपी ही वाहने कायदेशीर असल्याचे भासवण्यासाठी एकाच नोंदणी क्रमांकाचा वापर करत होते. वाहन हस्तांतरण नियमांचे उल्लंघन करून सरकारची दिशाभूल केली जात असल्याचा आणि आर्थिक घोटाळा केला जात असल्याचेही उघडकीस आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी नागपूरच्या यशोधरानगर येथील रहिवासी फिरोज आलम (२६) आणि अजगर हुसेन (५६) यांना अटक केली आहे. आरोपींकडून इंडो फार्म, ॲक्शन कन्स्ट्रक्शन आणि स्टॅंडर्ड कंपनीच्या एकूण तीन हाइड्रो क्रेन मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या मशीनचे एकूण मूल्य सुमारे २० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील कार्यवाहीसाठी दोन्ही आरोपींना जप्त केलेल्या मशीनसह कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने ही कार्रवाई केली.
लोकवाहिनीने प्रकाशित केली होती बातमी
राज्यभरात असे दोन हजारांवर वाहने आहेत. यात अनेक चोरीची वाहने आहेत. आज लोकवाहिनीने राज्यभरातील अशा डुप्लिकेट रजिस्ट्रेशन, ओनरशिप बदल, टॅक्स क्लिअरन्स, आरसीमधे बदल याची आकडेवारीसह राज्यभराची बातमी दिली आहे. हा आकडा केवळ दोन हजारांपुरता नाही. अंदाजे २० ते २२ हजार वाहने असतील. एकट्या नागपुरातील वाहनांची संख्या ३०० ते ३५० असावी. हा केवल एकच प्रकार पकडला गेला आहे.

















