तीन महिन्यांत दुसऱ्यांदा धक्का
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : देशभरात दैनंदिन वापराच्या आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असताना केंद्र सरकारने रविवारी सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक महागाईचा झटका दिला आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो वजनाच्या द्रवीकृत पेट्रोलियम वायू अर्थात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन दर तत्काळ लागू करण्यात आले असून या वाढीमुळे लाखो कुटुंबांच्या मासिक स्वयंपाकघर खर्चात वाढ होणार आहे.
नवीन दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ९१३ रुपयांवरून ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईमध्ये सिलेंडरचा दर ९१२.५० रुपयांवरून ९४१.५० रुपये झाला आहे. कोलकाता येथे हा दर ९८४ रुपये, चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये, गुरुग्राममध्ये ९५०.५० रुपये, नोएडा येथे ९३९.५० रुपये, भुवनेश्वरमध्ये ९८४ रुपये, चंदीगडमध्ये ९४१.५० रुपये, हैदराबादमध्ये ९९४ रुपये, जयपूरमध्ये ९४५.५० रुपये, लखनौमध्ये ९७९.५० रुपये, पाटणा येथे १,०३१.५० रुपये तर तिरुवनंतपुरमध्ये ९५१ रुपये इतका झाला आहे.
गेल्या तीन महिन्यांतील ही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातील दुसरी वाढ आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा २९ रुपयांची









