केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण!
लोकवाहिनी न्यूज:नवी दिल्ली : सोशल मीडियावरून ‘ई२०’ पेट्रोलबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांना आणि चुकीची माहितीला केंद्र सरकारनं आता पूर्णविराम दिला आहे. ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब होते, विम्याचे संरक्षण मिळत नाही आणि पर्यावरणाचं आतोनात नुकसान होतं, अशा अनेक दाव्यांचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात एक सविस्तर ‘१० मुद्द्यांचे स्पष्टीकरण’ जारी केलं असून, हे इंधन पूर्णपणे सुरक्षित आणि वैज्ञानिक निकषांवर आधारित असल्याचं स्पष्ट केलं आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित करण्याचा हा कार्यक्रम शास्त्रीय संशोधन, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि कडक नियामक मानकांवर आधारलेला आहे.













