नितीन गडकरी यांची उपस्थिती
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने दिवाळीच्या पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या ‘खासदार शिव किल्ले स्पर्धा – २०२६’ चा बक्षीस वितरण सोहळा रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या बास्केटबॉल ग्राउंडवर आयोजित करण्यात आला आहे।
या बक्षीस वितरण सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून सर्व आमदार, कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके आणि राजे मुधोजी भोसले यांचीही उपस्थिती लाभणार आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास, शौर्य आणि स्थापत्यवैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित या स्पर्धेत शहरातील शालेय व खुल्या गटांतर्गत १२५ हून अधिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती सहभागी झाल्या होत्या।
बक्षीस वितरण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्पर्धेचे संयोजक अतुल गुरु, सहसंयोजक संजय बंगाले यांच्यासह खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे।















