लोकवाहिनी न्यूज,नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर भीषण हल्ला झाला आहे. ‘हाजी अली’ नावाच्या जहाजावर ओमानच्या सागरी किनाऱ्यावर ड्रोन हल्ला झाला. हल्ल्याची तीव्रता अतिशय जास्त होती. हल्ल्यानंतर हाजी अली जहाजाला जलसमाधी मिळाली. हाजी अली मालवाहू जहाज होते.
इराण युद्धादरम्यान भारतीय जहाजावर ड्रोन हल्ले झाल्याच्या मोजक्या घटना घडल्या आहेत. हाजी अलीवर नेमका कोणी हल्ला केला, याबद्दल स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.हाजी अली जहाजावर १४ जण होते. ओमानच्या नौदलाने त्यांना वाचवण्यात यश मिळवले आहे.








