महिला, बालकेला धडक दिल्याचा आरोप
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : वैष्णव देवी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत एक महिला आणि तिचा चार वर्षीय मुलगा अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी महिला और तिच्या मुलाला रस्त्याच्या कडेला हलविले.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संबंधित खासगी ट्रॅव्हल्स बस चौकातच अडवून धरली. त्यामुळे चौकातील वाहतूक विस्कळीत होऊन काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचा पोलिसांचा ताफा घटनास्थलली दाखल झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातास कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेली बस संजय ट्रॅव्हल्सची असल्याचे समोर आले आहे. भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीवरून सांगण्यात येत आहे. मात्र, अपघाताची नेमकी कारणे आणि जबाबदारी याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शहर वाहतूक पोलिसांनी नागपूर शहरातून होणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या वर्दीलीला मनाई केली होती. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता खासगी ट्रॅव्हल्सची शहरातील वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वैष्णव देवी चौकातील या अपघातामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या वेगावर आणि शहरातील त्यांच्या वाहतुकीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पुलिसांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
चालकाची चूक नाही
घटनेनंतर संजय ट्रॅव्हल्सने बसच्या डॅशकॅचे फुटेज जाहीर केले आहे. अपघात घडला त्यावेळी बस ८ किलोमीटर प्रतितास वेगाने होती. सिग्नल नुकताच हिरवा झाला होता. बसचा वेग कमी होता. फुटेजनुसार महिला डाव्या बाजूने बस खाली आल्याचे दिसत आहे. यात चालकाची चूक नाही, हा अपघात आहे, असे संजय ट्रॅव्हल्सने स्पष्ट केले.












