सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीचा अमृत महोत्सव
लोकवाहिनी न्यूज,गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, परमेश्वराचे आशीर्वाद मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीनंतरच्या लोकार्पणाच्या अमृत महोत्सवात, या मंदिरात आल्यावर मिळालेल्या दिव्य अनुभूतीचे पंतप्रधानांनी वर्णन केले आहे. या मंदिरात श्री सोमनाथच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांमध्ये असलेला उत्साह आणि ऊर्जा बघून आपण भावूक आणि सद्गदित झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन झाले, त्यावेळी, त्यांच्या भावना काय असतील, याचा क्षण आपण प्रत्यक्ष अनुभवल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
सोमनाथ अमृत महोत्सवाचे भक्तिमय वातावरण संपूर्ण भवतालात एक अद्वितीय ऊर्जा निर्माण करत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
सोमनाथच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ह्या भक्तीची अनुभूती येत असल्याची भावनाही मोदी यांनी व्यक्त केली आहे. मंदिराच्या पुनर्बांधणी आणि दर्शनासाठी दारे उघडल्याच्या घटनेच्या या अमृत महोत्सवानिमित्त, लक्षावधी भाविक इथे जमले असल्याचे, त्यांनी नमूद केले आहे. हा ऐतिहासिक दिवस, भारताच्या सांस्कृतिक प्रवासातील एक मैलाचा टप्पा होता, असेही त्यांनी अधोरेखित केले आहे. एक्स या समाजमाध्यमावर, आपल्या पोस्टच्या मालिकेत त्यांनी म्हटले आहे, जय सोमनाथ! ह्या मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इथे येणे, परमेश्वराचा साक्षात आशीर्वाद आहे. ■








