संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना
लोकवाहिनी न्यूज नागपुर : नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल-याने संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने विविध उपाययोजना करण्याचे प्रस्तावित केले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुणे किंवा बगीचासाठी केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंड ठोठावला जाणार आहे. महापौर निता ठाकरे यांनी नागपूर शहराच्या संभाव्य पाणी टंचाईच्या संदर्भात जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जलसाठ्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा गैरवापर टाळावा, पाणी जपून वापरावे असे आवाहन केले.
यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड़, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दानी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, जलप्रदाय समितीच्या सभापती दिव्या धुरडे, आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे, धरमपेठ जोनच्या सभापती धनश्री देशपांडे, अतिरिक्त आयुक्त मुरुगनाथम एम., अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाइकर यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.
यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ ५८ टक्के साठा आहे. पाण्याचा उपलब्धता विचारत घेऊन याद्वारे पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.
बेकायदेशीर जोडण्यांवर कार्रवाई सणासुदीचा काळ असला तरी बेकायदेशीर जोडण्यांद्वारे पाणी घेणाऱ्यांविरुद्ध कठोर मोहीम राबविण्यात येईल. त्यांची जोडणी बेकायदेशीरवरून कायदेशीर करून घेण्याची संधी देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तात्काळ शिबिरे आयोजित केली जातील. त्यानंतर बेकायदेशीर जोडणीच्या ठिकाणी मोटर बसवावेत आणि मीटरमध्ये छेडछाड झाल्याचे किंवा तो काढून टाकल्याचे आढळल्यास अशा दोषी ग्राहकांविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात येईल, असेही या बैठकीत ठरवण्यात आले.
सार्वजनिक बिहिरींची स्वच्छता शहरातील सार्वजनिक बिहिरींची स्वच्छता आणि सौर पंपांची स्थापना करून लघु पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. जलाशयांमधून होणारा पाण्याचा वापर कमी करण्यासाठी, सध्याच्या बिहिरींची प्रयोगशाळेत पाण्याचा गुणवत्ता तपासून स्वच्छ करून एमईडीआईच्या मदतीने सौर पंप बसविणे आणि लघु पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे प्रस्तावित आहे. अशा योजनांमधून मिळणारे पाणी वाहनांची धुलाई, बागकाम इत्यादी पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरता येईल.












