मुख्यमंत्री विजय यांच्या उपस्थितीतील वक्तव्याने वाद
लोकवाहिनी न्यूज:चेन्नई : ‘लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या सनातनाचे निर्मूलन झाले पाहिजे’, असे वक्तव्य तामिळनाडूचे द्रमुक (डीएमके) नेते आणि माजी मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मंगळवारी तामिळनाडू विधानसभेत बोलताना त्यांनी लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या सनातनाचे निर्मूलन झाले पाहिजे, असे वक्तव्य केले.
विशेष म्हणजे, हे विधान त्यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या उपस्थितीत केले. त्यांच्या तामिळ भाषेतील भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. उदयनिधी स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपचे प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी या विधानाला विषारी बडबड असे संबोधले. त्यांनी म्हटले की, तामिळनाडूच्या राज्य चिन्हावर मंदिराचा गोपुरम आहे. त्यामुळे राज्यातील जनतेच्या श्रद्धेचा आणि धार्मिक भावनांचा असा अपमान जनता कधीही विसरणार नाही. त्यांनी पुढे काँग्रेस नेते (पान ६ वर).









