लोकवाहिनी न्यूज:गुवाहाटी : भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. हिमंत बिस्व सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंगळवारी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
गुवाहाटी येथील खानापारा स्थित वेटरनरी कॉलेज क्रीडांगणावर आयोजित भव्य समारंभात डॉ. सरमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. डॉ. सरमा यांच्या शपथविधीनंतर भाजपचे नवनिर्वाचित आमदार रामेश्वर तेली आणि अजंता नेओग, आसाम गण परिषदेचे अतुल बोरा आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटचे चरण बोडो यांनी मंत्रीपदाची (पान ६ वर) शपथ घेतली.









