लोकवाहिनी न्यूज
मुंबई : नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, तुम्हाला संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर पोलीस सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, असा जाहीर सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला असून, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहून केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत, राज ठाकरे यांनी थेट सेवेतील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत, जर एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या विशिष्ट विचारधारेबद्दल एवढीच आत्मीयता असेल, तर त्यांनी शासकीय सेवेत राहण्याऐवजी खुलेपणाने त्या संघटना किंवा राजकीय पक्षात सामील व्हावे, असा स्पष्ट सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, पोलीस सेवेतील अधिकारी निष्पक्ष असणे अपेक्षित असताना, अशा सार्वजनिक सहभागामुळे त्यांच्या तटस्थतेवर प्रश्न निर्माण होतात. तसेच सध्या काही अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरू असल्याचे उल्लेख करत, अशा परिस्थितीत तुमच्यासाठीही व्यवस्था होईल, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे. याचबरोबर राज ठाकरे यांनी
नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून केलेल्या कौतुकपर वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या वादात उडी घेत खणखणत शब्दात खोचक टिप्पणी करत, या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. आव्हाड यांच्या या प्रतिक्रियेमुळे संघ कार्यक्रमातील अधिकाऱ्यांच्या सहभागावरून सुरू झालेला वाद अधिकच तीव्र झाला असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.
पोलीस वर्दीच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत, खाकी वर्दी ही कोणत्याही विचारधारेची नसून, ती केवळ जनतेच्या सेवेसाठी आहे, याकडे लक्ष वेधले. जर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी विशिष्ट विचारधारेकडे झुकले, तर सामान्य नागरिकांनी न्याय आणि सुरक्षिततेसाठी कोणाकडे पाहायचे, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरही टिप्पणी करताना, आज लोकप्रतिनिधींची भूमिका कमकुवत होत चालली असून, अनेक ठिकाणी राजकीय दबाव वाढत असल्याचे म्हटले आहे. अशा स्थितीत प्रशासन आणि पोलीस यंत्रणा जर निष्पक्ष राहिली नाही, तर लोकशाही व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात त्यांनी २०१२ मधील एका घटनेचा संदर्भ देत सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने सार्वजनिक भूमिका घेतल्यावर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती, मग आताच्या प्रकरणात सरकारची भूमिका वेगळी का आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.












