अली फजल आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मिर्झापूर : द मूव्ही’ने रिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.
सेंक निलकच्या या माहितीनुसार, चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तब्बल ३६ कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी चित्रपटाने ३२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर पहिल्या दिवशी २५.७५ कोटी रुपयांची कमाई झाली. अशा प्रकारे तीन दिवसांत चित्रपटाचे भारतातील नेट कलेक्शन ९३.७५ कोटी रुपये झाले आहे. भारतातील ग्रॉस कलेक्शनचा विचार केला तर चित्रपटाने आतापर्यंत ११२.३५ कोटी रुपये कमावले आहेत. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर ‘मिर्झापूर : द मूव्ही’ने १३२.३५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या कमाईवरून दिसून येत आहे.
‘मिर्झापूर’ या वेबसिरिजची आधीपासूनच मोठी फॅन फॉलोईंग आहे. त्याचा फायदा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळत असल्याचे दिसत आहे. रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटाने चांगली पकड निर्माण केली आहे. दरम्यान, यशाच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या कमाईचा वेग तुलनेने कमी झाला आहे. चित्रपटने बाराव्या दिवशी २.४२ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील नेट कलेक्शन २४५.७५ कोटी रुपये, तर जगभरातील कमाई ३३७.८० कोटी रुपये झाली आहे.













