नागपूर : उपराजधानीतील तरुणाईच्या एमडी, गांजा, डोडा पावडं आणि अन्य नशेच्या आहारी नेणारा अमली पदार्थाचा साठा राजस्थान आणि मुंबईतून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकवाहिनी नागपुरात येणारे ड्रग्ज आणि इतर अमली पदार्थांच्या तस्करीच्या मागार्वा आहे. त्यातून ही माहिती मिळाली.
सिमेफलीकडून हा साठा मोठ्या प्रमाणावर राजस्थान प्रांतात येते. यासाठी काही ठराविक तस्करांनी नेमणूक सीमेवर काम करणाऱ्या केली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही ड्रग्ज आणण्याचे काम दिले जात नाही. यात अत्यंत हाय क्वालिटीचे एमडी आणि हेरॉईनचा समावेश असतो.
राजस्थानमध्ये हा ठोक साठा आल्यानंतर त्याचे विभाजन केले जाते. त्यानंतर त्यातून नागपुरातील डिमांडच्या आधारे पॅकिंग केले जाते. राजस्थानातून हा साठा सरकारी बस, खासगी ट्रॅव्हल्स, खासगी वाहनांच्या माध्यमातून जयपूर किंवा ग्वाग्वालियरपर्यंत आणला जातो. यासाठी दोन ते तीन रस्त्यांचा वापर केला जातो.
ग्वाग्वालियर आणि जयपूर अशा दोन मार्गांनी रस्त्यामार्गे ड्रग्सचा साठा नागपुरात पोहोचतो. नागपुरात आल्यानंतर या साठ्याची आणखी विभागणी केली जाते. शहरातील कोणकोणत्या भागात किती ड्रग्सची मागणी आहे, त्यावर छोटे छोटे पाकिट तयार केले जातात. सोमेफलीकडून जेव्हा ड्रग्स भारतात येतात, तेव्हा त्याची क्वालिटी सुपरफाइन असते.
भारत आल्यानंतर राजस्थानात या सुपर फाइन क्वालिटीमध्ये काही प्रमाणात रक्षनाचे मिश्रण केले जाते. त्यानंतर पुन्हा नागपुरात त्यावर प्रक्रिया केली जाती. प्रक्रिया केल्यानंतर एक ते दीड ग्रॅम, दोन ग्रॅम, तीन ग्रॅम पॅकिंग केले जाते. सांकेतिक भाषेत त्याला छोटी रजनीगंधा म्हटले जाते.
अशीच दुसरी मोठी कन्साइनमेंट मुंबई मार्गे नागपुरात येते. मुंबई ते नागपूर या वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर केला जातो. अत्यंत सफादारपणे हा साठा नागपुरात पोहोचतो. रस्त्याने किंवा किंवा रेल्वे मार्गे ड्रग्स नागपुरात पोहोचण्यासाठी तस्करांकडून राजस्थानपासून नागपूरपर्यंत सगळेकडे सेटिंग लावून ठेवलेली असते. त्यामुळे कधीकधी मोठा साठा तपास यंत्रणांच्या हाती लागत नाही. ठरल्याप्रमाणे दोन ग्रॅम, तीन ग्रॅम साठा पकडला जातो. त्यातून ‘तेरो भी चुप, मेरी भी चुप’ असे काम अनेक वर्षांपासून चालत आहे.
किमतीत डेढ़पड वाढ
नागपुरात विकल्या जाणाऱ्या अमली पदार्थांचे दर गेल्या वर्षीतून वाढले आहेत. एक ग्रॅम वजनाची एमडीचे पाऊच दीड हजार ते दोन हजार रुपयांमध्ये विकले जात आहे. शहरातील नामांकित हॉटेलर्स, रेन्सॉर्ट आणि पबमध्ये जाणाऱ्या तरुणाईला त्यांना हवे असलेले ‘स्टाफ कोणाकडे व कधी मिळेल हे माहिती असते. स्टाफ अर्थात ड्रग्ससोबत या तस्करांकडून मुलींचा पुरवठा देखील तरुण याकंडेना केला जातो. मात्र काही अपवाद वगळता आजपर्यंत या एमडी तस्करांच्या मुख्यपर्यंत पोलिस पोहचू शकलेले नाहीत. त्यामुळे दोन खेचड्रग्स पकडल्यानंतर त्याची ‘रिर्ह्स इन्कॅस्टिगेशन’ का थांबते असा प्रश्न उपस्थित होत आहे.














