जगत टाले विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळात तर संजीव चोपडेंची कृष्णा खोरे विकास महामंडळात नियुक्ती
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने सन २०२५-२६ या निवडसूची वर्षातील सेवाज्येष्ठतेनुसार दोन मुख्य अभियंत्यांना सचिव व सचिव समकक्ष दर्जाच्या कार्यकारी संचालकपदी पदोन्नती देण्याचा शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार अमरावतीचे मुख्य अभियंता जगत दयाराम टाले आणि पुण्याचे मुख्य अभियंता संजीव दगडू चोपडे यांची कार्यकारी संचालक म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.
जलसंपदा विभागाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी हा शासन आदेश जारी केला. मुख्य अभियंता (स्थापत्य), गट-अ या संवर्गातून सचिव व सचिव समकक्ष दर्जाचे कार्यकारी संचालक/महासंचालक, गट-अ या संवर्गातील रिक्त पदांवर ही पदोन्नती करण्यात आली आहे.












