सोले, वंजारी, कराळे, कोहळे, वानखेडे मैदानात
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री पंकज भोयर, आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, कृष्णा खोपडे, किशोर जोरगेवार आदी उपस्थित होते.
कॉंग्रेसकडून अभिजित वंजारी यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, विजय वडेट्टीवार, प्रवक्ते अतुल लोंढे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आदी उपस्थित होते. उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करीत भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. वंचित बहुजन आघाडीकडून मंगेश वानखेडे यांनी तर लोकजागृती मोर्चाचे रमण सेनाड यांनीही अर्ज भरला.
कोण म्हणाले काय?
-
अभिजित वंजारी यांनी पदवीधरांसाठी मोठे काम केले आहे. त्यामुळे पदवीधरांकडून त्यांच्या नावाकाला प्राधान्य दिले जाईल. भाजपला यातून मोठा झटका बसेल.
— विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस आमदार
-
पदवीधर मतदारसंघही votewote होऊ शकते. भाजपच्या हातून हा मतदारसंघ गेल्याने ते अस्वस्थ आहेत. सरकार जे करू शकले नाही, ते वंजारी यांनी करून दाखविले आहे.
— हर्षवर्धन सपकाळ, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष
-
पदवीधर मतदारसंघात काही जणांची मक्तेदारी होती. ही मक्तेदारी आता संपली आहे. पदवीधरांसाठी आता त्यांच्यासाठी काम करणारा आमदार हवा आहे. त्यामुळे आमचा विजय होईल.
— नाना पटोले, कॉंग्रेस आमदार
-
भाजपडून आपल्याला संधी मिळाल्याचा आनंद आहे. आपल्यावर मोठी जबाबदारी आली आहे. महायुतीचा पदवीधर मतदारसंघात विजय निश्चित आहे. महायुतीमधील प्रत्येकाकडून सहकार्य मिळत आहे.
— सुधाकर कोहळे, महायुतीचे उमेदवार
-
मी स्वयंसेवक आहे. निवडणूक लढविण्यासठी अर्ज दाखल केला आहे. ऐनवेळेरी अर्ज मागे घेण्यासाठी आपण उमेदवारी दाखल केलेली नाही. लोकजागृती मंच नक्कीच निवडणुकीत कमाल करेल यात शंका नाही.
— रमण सेनाड, लोकजागृती मंच
-
पदवीधरांचा आपल्यावर विश्वास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. लोकांच्या आग्रहाखातर अर्ज दाखल केला आहे. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच काम केले आहे.
— प्रा. अनिल सोले, अपक्ष उमेदवार
-
आपण यापूर्वी केवळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत होतो. परंतु आता आपण शिक्षण क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. असा कोणीही व्यक्ती नसेल ज्याला आपले नाव ठाऊक नाही.
— नितीन कराळे, उमेदवार
उमेदवार उवाच!
-
भाजप पूर्ण ताकदीने मुकाबला करणार आहे. कॉंग्रेसची पूर्ण तयारी आहे. आपण पदवीधरांसाठी काम केले आहे. त्यांची परफेफे मिलिेल यावर विश्वास आहे.
— अभिजित वंजारी, कॉंग्रेस उमेदवार













