मंत्री गिरीश महाजन यांची माहिती : शासनाकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : अलनिनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पर्जन्यमानात मोठी घट झाली असून, राज्यातील जलसाठा मर्यादित आहे. या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंपद विभागाने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे पाण्याचे धरणनिहाय व वापरनिहाय अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे. राज्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून १६ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
सन २०१६ च्या खरीप हंगामातील ‘टिगर-१’ लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पुढील वर्षांपर्यंत अलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आणि कठोर उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे महाजन यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्र्याचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंपदा विभाग, महसूल, कृषी, उद्योग आणि नगरविकास विभाग पूर्ण समन्वयाने काम करत आहेत. पालकमंत्री आणि कालवा सल्लागार समित्यांच्या माध्यमातून पाण्याचा नियमित आढावा घेतला जाईल. आगामी वर्षातील पाण्याचे संकट टळण्यासाठी नागरिकांनी आणि सर्व यंत्रणांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
महत्त्वाचे निर्णय व निर्देश
-
धरणे व जलाशयामधील पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. बाष्पीभवन, गाळ व अनधिकृत उपसा विचारात घेऊन ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवले जाईल.
-
याशिवाय, भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन प्रत्येक पर्ण्यात १० टक्के अतिरिक्त आपत्कालीन बफर साठा राखीव ठेवला जाईल. अत्यंत गरज भासल्यास तांत्रिक तपासणी करून मृतसाठ्यातीलण्याचा वापर केला जाईल.
-
सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करावी. पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) पूर्ण क्षमतेने चालवून प्रक्रिया केलेले पाणी बाग, बांधकाम व पलाईसाठी वापरावे.
-
पिण्याचे पाणी, जनावरे आणि वाण्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचे सिचनासाठी वाटप होईल. प्रथम रबी हंगामातील भुसार व चारा पिकांना, त्यानंतर इतर रबी पिकांना आणि पाणी शिल्लक राहिल्यास बारमाही पिकांना मंजुरी दिली जाईल. पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतीवर भर दिला जाईल.
-
औद्योगिक क्षेत्रातील वापरासाठी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
-
धरणे, नद्या व कालव्यामधून होणारा अनधिकृत पाणी उपसा तात्काळ रोखण्यासाठी महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाची संयुक्त पथके गस्त घालतील. दोषींवर कारवाई करून बेकायदेशीर पंप व साहित्य जप्त केले जाईल.












