पदवीधर निवडणुकीसाठीची खदखद बाहेर
लोकवाहिनी न्यूज
नागपुर : भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि पक्षातील वाढती निरंकुशता भविष्यात घातक ठरू शकते, अशी खदखद व्यक्त करणारी परखड भूमिका पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील बंडखोर उम्मीदवार प्रा. अनिल सोले यांनी मांडली. आपला उमेदवारी मागे करून घेण्यासाठी प्रयत्न झाले, तरी आपण माघार घेतली नाही, असे नमूद करीत पक्षांतर्गत नाराजीला जाहीरपणे वाट मोकळी करून दिली.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बडकस चौकात प्रा. अनिल सोले यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार गिरीश व्यास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. गौरीशंकर पाराशर आदी यावेळी उपस्थित होते.
मला कोणी कितीही खाली बसण्याचा प्रयत्न केला, तरी मी थांबणार नहीं. आमचे ठरले आहे, अशा ठाम शब्दांत प्रा. सोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही किंवा अर्ज भरल्यानंतर माघार घेऊ, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, आपण अर्ज दाखल करण्याचा निर्णय आधीच निश्चित केला होता. माजी आमदार गिरीश व्यास आणि आपण एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये पक्षासाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांची होणारी घुसमट हा त्यांच्या नाराजीचा केंद्रबिंदू आहे. पक्षासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्याला अचानक घरी बसवायचे, कार्यक्रमांना बोलावायचे नाही किंवा कोणतीही जबाबदारी द्यायची नाही, अशा प्रकारांमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे सोले यांनी अधोरेखित केले. कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली जात नसेल, तर संघटनेत नाराजी वाढणे स्वाभाविक असल्याचा संदेश त्यांच्या वक्तўव्यातून मिळतो.
कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून, मतदारसंघातील जनता आपल्याला निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्याची दबाब किंवा प्रयत्न झाले, तरी निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांची घुसमट थांबावी
पक्षातील निर्णयक्रियेत सामान्य कार्यकर्त्यांना योग्य स्थान मिळणे आवश्यक आहे. संघटनेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे. पक्षात वाढणारी निरंकुशता भविष्यात घातक ठरू शकते, असा इशाराही प्रा. सोले यांनी दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.













