संबंधित विभागांना पाठपुरावा करण्याचेही निर्देश
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : मनपाचा टाऊन हॉलसह शहरातील निर्माणाधीन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. हिवाळी अधिवेशनाच्या काळात मनपाच्या टाऊन हॉल सह विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने महापौरानी प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच ज्या कामांना राज्य सरकारच्या निधीची आवश्यकता आहे, त्या प्रकल्पांसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश महापौरानी यावेळी दिले.
शहरातील विकास प्रकल्पांच्या स्थितीची माहिती ठाकरे यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांकडून आज पार पडलेल्या बैठकीत घेतली. यावेळी उपमहापौर लीला हाथीबेड़, स्थायी समितीच्या सभापति शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांच्यासह अतिरिक्त अंकित यांच्यासह सर्व विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने तयारीला वेग देण्याचे निर्देश ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. मनपाच्या महाल भागात उभारण्यात येत असलेल्या राजे रघुजी नगर भवनाच्या (टाऊन हॉल) बांधकामाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. उर्वरित कामे त्वरित पूर्ण करून हिवाळी अधिवेशनाच्या काळात या टाऊन हॉलचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने कामाला वेग द्यावे, असे निर्देश महापौरानी यावेळी दिले.
मिनीमातानगर भागातील प्रस्तावित हॉस्पिटल तसेच क्वेटा कॉलोनीतील देवडीया हॉस्पिटलचे कामे पूर्णत्वात् जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नरेंद्रनगरात फूड कोर्ट उभारणे तसेच वर्धा मार्गावरील प्राईड हॉटेल समोरील रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार चौकाचे सौंदर्यकरण करून तेथे फाऊंटन उभारण्याच्या काम पूर्ण करण्याचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे भांडेवाडी भागातील फिश मार्केटचे बांधकाम डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार असल्याचें यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
भांडेवाडी परिसरत उभारण्यात येत असलेल्या मोकाट श्वानासाठी उभारण्यात येत असलेल्या डॉग शेल्टरचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे, जखमी व आजारी श्वानांवर उपचार करून त्यांना सोडून देणे यासाठी हे डॉग शेल्टरमध्ये होणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विकास कामे करताना अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे महापौर ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी प्रकल्पांच्या कामामध्ये होणाऱ्या विलंबाबार आपली नाराजी व्यक्त केली. तसेच प्रकल्पाचे लोकार्पण करण्याकरिता सर्व विभागाचे एनओसी प्राप्त करून घेण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
















