मजुरांचा रोजगार हिरावला, फळप्रेमींचीही हिरमोड
मनोहर चव्हाण
नागपूर : यंदाच्या दुष्काळाने शेतातील पिकांचाच नव्हे, तर जंगलातील नैसर्गिक मेव्यालाही सोडle नाही. दिवाळीच्या दिवसांत बाजारपेठेत गावरान सीताफळांचा गोडवा दरवळायचा. मात्र, यंदा काटोल आणि नरखेड तालुक्यांतील जंगलात सीताफळांची झाडे फळांनी लगडण्याऐवजी आलेली फळे झाडांवरच सुकली. पावसाच्या लहरीपणाने आणि पाण्याच्या अभावाने गावरान सीताफळांचा हंगामच हिरावल्याने हा नैसर्गिक मेवा यंदा बाजारपेठेतून कोसो दूर राहिला आहे.
काटोल आणि नरखेड तालुक्यांतील जंगलामध्ये सीताफळांची नैसर्गिक झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः जंगलातील नाल्यांच्या काठावर वाढलेल्या झाडांना दरवर्षी भरपूर फळे लागतात. या फळांना बाजारात मोठी मागणी असते. कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांपेक्षा जंगलात नैसर्गिकरीत्या वाढलेल्या गावरान सीताफळांची चव अधिक गोड आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याने दिवाळीच्या काळात त्यांची आवर्जून खरेदी केली जाते. मात्र, यंदा कमी पावसाचा फटका या झाडांनाही बसला. झाडांना फळे लागली; पण पुरेशा ओलावाभावी त्यांची अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, फळे झाडांवरच सुकून गेली.
सीताफळांचा हंगाम हा या भागातील ग्रामीण मजुरांसाठी उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन आहे. दरवर्षी पावसामुळे जंगलात तयार होणारी सीताफळे गोळा करून हे मजूर रस्त्याच्या कडेला टोपल्या मांडतात. काही जण नागपूर शहरात गल्लीबोळात फिरून सीताफळांची विक्री करतात. या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या घरखर्चाला हातभार लागो. विशेष म्हणजे दिवाळीच्या सणासाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चची जुळवाजुळव याच हंगामातील कमाईतून केली जाते. मात्र, यंदा सीताफळांचे उपलब्ध नसल्याने या मजुरांच्या हाताला काम मिळाले नाही. जंगलातील मेव्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या दिवाळीच्या आनंदावरही दुष्काळाने विरजन घातले.
एकीकडे पावसाच्या कमतरतेमुळे सीताफळांचे उत्पादन घटले, तर दुसरीकडे शेतीच्या विकासाच्या नावाखाली जंगलालगतच्या जमिनीवरील नैसर्गिक झाडांची कत्तल हा आणखी एक चिंतेचा विषय आहे. पूर्वी नाल्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात असलेल्या सीताफळांच्या झाडांमधून ग्रामीण भागातील नागरिकांना सहजपणे फळे मिळत होती. मात्र, जमिनीचा वापर बदलने आणि झाडांची संख्या कमी झाल्याने नैसर्गिक सीताफळांचा स्रोतही आक्रसत चालला आहे.
सीताफळ खवय्यांची निराशा
यंदा दुष्काळाने निसर्गाचा गोडवा हिरावून घेतला आहे. एका बाजूला जंगलातील फळे सुकली, तर दुसऱ्या बाजूला त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांच्या हातचा रोजगार गेला. सीताफळांच्या नैसर्गिक चवीसाठी दिवाळीची वाट पाहणाऱ्या खवय्यांना यंदा निराश व्हावे लागले. दुष्काळाची झळ केवळ शेतीपुरती मर्यादित नसून ती जंगलातील नैसर्गिक संपत्ती and ग्रामीण अर्थव्यवस्थेसाही बसत असल्याचे गावरान सीताफळांच्या ठप्प झालेल्या हंगामातून स्पष्ट झाले आहे.

















