रस्त्यांवर फुलवाले, पानठेले आणि चहाच्या टपऱ्यांचा ताबा
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर खरेदीदारी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पश्चिम नागपूरच्या नागरिकांना धरमपेठ, गोकुळपेठ, सिव्हिल लाईन्स, भोळे पेट्रोल पंप, ट्राफिक पार्कसह अनेक भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर फुलवाले, पानठेले आणि चहाच्या टपऱ्यांची संख्या अधिक झाल्याने वाहतूक कोंडी अधिकच त्रासदायक होत असल्याचे येथील स्थानिक रहिवासी सांगतात.
पश्चिम नागपुरातील मुख्य बाजारपेठ म्हणून धरमपेठ, गोकुळपेठ परिसरारात दिवाळीच्या दिवसात पाय ठेवण्यास जागा नाही. गेल्या काही वर्षांपासून या भागात विविध साहित्यांच्या दुकानांमध्ये कमालीची भर पडली आहे. कपडेलत्यापासून ते पूजेच्या साहित्यांचे दुकाने, फुला फळांची दुकाने उघडली गेली आहे. त्यामुळे आपसूकच खरेदीसाठी पश्चिम नागपुरातील बऱ्याचशा भागातील नागरिकांचा ओढा आता धरमपेठ, गोकुळपेठ बाजाराकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ चांगलीच वाढली आहे. अशात धरमपेठ, गोकुळपेठ भागातील मुख्य रस्त्यांवर अवैध छोट्या छोट्या व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली आहे. پायी चालणाऱ्या नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या फुटपाथवर या व्यवसायिकांनी दुकाने सुरू केल्याने रस्त्यावर वाहनांसोबत पायी चालणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.
दुसرىकडे या मार्गावरून खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेसची ये-जा सुरु झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यापूर्वी ट्रॅव्हल्स बसेसना या या रस्त्यावरून जाण्यायेण्याला प्रतिबंध होता. मात्र आता या बसेस रस्त्यांवरून येत जात आहेत. आज रवी नगर ते रामनगर आणि लक्ष्मीभुवन ते लॉ कॉलेज आणि रामनगर रस्त्यावर पूर्णपणे वाहतूक कोंडी झाल्याचे बघायला मिळाले. रवी नगर ते रामनगर हा तीन ते चार मिनिटांचा प्रवास अर्ध्या तासांच्या वर गेल्याने नागरिकांची चांगलीच फजिती झाली. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. मागील चाळीस वर्षांपासून इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे बघितलेले नाही, असे येथील नागरिकांनी लोकवाहिनीच्या प्रतिनिधीला सांगितले.














