गडचिरोली : जिल्ह्यातील माओवाद आता संपुष्टात आला असून, जिल्ह्यातील नागरिक आता माओवादाच्या दशहतीतून मुक्त झाले आहेत. भूतकाळात सुरक्षा दलांना धोका पोहोचवण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारंचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे. आंतरराजकीय सीमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनीयता जंगल परिसरात जमिनीमध्ये लपवून ठेवले जात असे. त्याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करून आणण्यास केला जात होता. या विरोधात दिनांक नोव्हेंबर रोजी प्रभावी कारवाई करीत माओवाद्यांनी जंगलामध्ये जमीनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिस दलातील जवानांना यश आले आहे.
माओवाद्यांनी पोस्ते गेरपती हद्दीतील टब्बे जंगल परिसरात स्फोटक साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलिस दलान्स मिळाळी होती. गोपनीय माहितीच्या आधारे, ४ नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या मार्गदर्शनखाली जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणिहिता येथील ४ तुकड्या, बीडीजीएसचे २ पथक शोध अभियान राबविणे कामी रवाना करण्यात आले होते. सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथकाकडून शोध अभियान राबवून बीडीजीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता स्फोटकासाठी वापराचे ११ नग कुकर, कॉर्टेक्स वायर ३ बंडल (१०० फुट), ३ किलो गन पावडर, ४ नग डेटोनेटर, १ नग बॅटरी (१२ वॅट), २५० ग्रॅम फटाका बारूद, ४ नग स्टिल कंटेनर, ८ नग वायर बंडल, १ नग सोलर प्लेट व इतर माओवादी साहित्य विशेष अभियान पथक व बीडीबीएस पथकांद्वारे घटनास्थलாவरून हस्तगत करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलिस अधीक्षक अहेरी (प्राणिहिता) हर्षवर्धन बी. जे., पोलिस उप-अधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखी खाली विशेष अभियान पथक, गडचिरोली, प्राणिहिता व इंट सेल तसेच बीडीबीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलिस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी या कारवाईत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.
















