नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असा दावा भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला. माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी बंडखोरी केली असली तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांची समजून काढण्यात यशस्वी होतील. पुढील दोन दिवसांत सोले यांच्या बंडखोरीचा मुद्दा निकालात निघेल आणि ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा दावा फुके यांनी केला.
प्रा. अनिल सोले हे सर्वांचे मार्गदर्शक आहेत. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनाही त्यांची मदत मिळत असते. त्यामुळे सोले हे पक्षाच्या विरोधात जाणार नाहीत आणि अखेर कोहळे यांच्या विजयासाठीच भूमिका घेतील, असे फुके म्हणाले.
विद्यार्थ्यांना भडकविण्याचा प्रयत्न
एमपीएससी विद्यार्थी नसल्याने ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता अधिक असल्याचेंही त्यांनी म्हटले.
राहुल गांधी अर्बन नक्षल: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर फुके यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधी हे स्वतः अर्बन नक्षल आहेत. त्यांचे आंदोलन भारताला बदनाम करण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारसंघातील १३ कोटी मतदारांची नावे कापल्याचा राहुल गांधी यांचा आरोप बेछूट असून, कोणताही पुरावा नसताना ते आरोप करीत असल्याचें फुके म्हणाले.
घुसखोरांचे नावे मतदारयादीतून काढली तर निवडणूक आयोगाने काय चुकीचे केले, असा सवालही त्यांनी केला. राहुल गांधी आणि काँग्रेसची पोटदुखी ही त्यांची मतपेडी गेल्यामुळे असल्याचा आरोप फुके यांनी केला. डाव्या विचारसरणीचे लोक राहुल गांधी यांना आर्थिक पाठबळ देत असल्याचा आरोप करून तरुणांनी त्यांच्या नादाला लागू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
आंदोलन त्यांच्या मागण्यांसाठी असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत, तरीही आमदार रोहित पवार विद्यार्थ्यांना भडकविण्याचे काम करीत असल्याचा आरोप फुके यांनी केला. राहुल गांधी आंदोलनात सहभाग झाल्यानंतरच हे आंदोलन स्थगित होईल, अशी टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचा दावा फुके यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात रोहित पवार यांना किंमत दिली जात नाही.















