नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांच्या कल्याणसाठी काम करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) ऑनलाइन परीक्षेदरम्यान ७ ऑक्टोबर रोजी पुणे येथील आंबेगाव परिसरातील सन ब्राइट इंग्लिश मीडियन स्कूल या परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागल्याच्या प्राप्त झालेल्या तक्रारींची महाज्योती व वनार्टी प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात येणार आहे.
संबंधित परीक्षा केंद्राचे केंद्र निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संबंधित सहायक संचालक तसेच परीक्षा घेणाऱ्या संबंधित एजन्सीकडून घटनेबाबतचा सविस्तर अहवाल मागवण्यात येणार आहे. यासोबतच संबंधित परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार असून, उपलब्ध तांत्रिक नोंदी व परीक्षा प्रक्रियेचीही पडताळणी केली जाणार आहे. चौकशीअंती संबंधित प्रकरणात कोणाचीही दोषी भूमिका आढळल्यास नियमानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देता न आलेल्या पात्र विद्यार्थींचं नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित २०२६ रोजी ज्ञानदीप शिक्षा प्रसारक मंडळ आणि अंजनगिरी कम्प्युटर बेस्ड सेंटर, अष्टविनायक नगर, नांदेड येथे घेण्यात येणार आहे. या प्रकरणाची आवश्यक माहिती व अहवाल प्राप्त करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना समान संधी, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया आणि कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ न देणे याला महाज्योती व वनार्टीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय त्रुटींमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांचा संताप
परीक्षेतील भोंगळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. परीक्षा केंद्रावरील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन त्या-त्या ठिकाणी पुन्हा परीक्षा घेतल्या जातील.
या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. अंजली साळवे यांनी महाज्योतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार यांनीही नागपुरात या प्रकरणावर भूमिका मांडली.














