कार्रवाईतून करून दिली डीजे मर्यादांची आठवण
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : उपराजधानीत सध्या डीजेविरोधातील आंदोलन सुरू आहे. किती मर्यादित डीजे वाजवायला हवा, याची तरतूद कायद्यात आहे. नंतरही पोलिसांनी कार्रवाई न केल्याने हाईकोर्टानेही आश्चर्य व्यक्त केले आहे. अशात ध्वनी क्षमतेची मर्यादा ओलांडणाऱ्या बालमालकाला पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आठवणीचा हिसका दिला आहे.
ध्वनी प्रदूषणसंदर्भातील नियमांची पायमल्ली करून मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्या हिचकी बार अॅंड रेस्टॉरंट विरोधात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हिचकीमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात येत असल्याने कोणीतरी थेट पोलिस आयुक्तांना माहिती दिली. आयुक्तांनी कोणत्याही अधिकाऱ्याला याबाबत न सांगता थेट आपल्या एस्कॉर्ट पथकाला कार्रवाईचे आदेश दिले.
१३ सप्टेंबरच्या मध्यराती करण्यात आलेल्या कार्रवाई आयुक्तूंच्या एस्कॉर्ट पथकाला बारमध्ये मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजविण्यात येत असल्याचे आढळले. त्यामुळे पथकाने बारमधील डीजे जप्त केला. त्यानंतर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पार्क अॅव्हेन्यू बिल्डिंग येथे ही कार्रवाई करण्यात आली.
इमारतीच्या तेराव्या माळायावर डीजे मोठ्या आवाजात सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी इमारतीच्या बाराव्या माळायावरून ध्वनितीव्रता मोजणी यंत्राद्वारे डीजेच्या आवाजाची रीडिंग घेतली. यावेळी आवाजाची तीव्रता १००.६ डेसिबल इतकी असल्याचे निष्पन्न झाले. ही निर्धारित क्षмеतेपेक्षा जास्त असल्याने पोलिसांनी तत्काल डीजे बंद केला.
डीजे ऑपरेटर दीप मोरे (२२, रा. श्रीकृष्ण नगर, वाठोडा, नागपूर) याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. हिचकी बार व रेस्टॉरंट व्यवस्थापक अभय विरखडे (४४, कोलते ले-आऊट, गोधनी रोड, मानकापूर) याचीही पोलिसांनी कसून चौकशी केली.
काय असते एस्कॉर्ट पथक?
महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या वाहनसमोर दिशा दाखविणारे एक वाहन असते. त्याला पायलट कार असे म्हटले जाते. ही पायलट कार ज्या दिशela वळते त्यामागे महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती बसून असलेल्या वाहनाला वळावेच लागते. अशा व्यक्तींच्या वाहनामागे सुरक्षा रक्षकांचे एक वाहन असते. या वाहनालाच एस्कॉर्ट कार असे म्हटले जाते. नागपूर शहराच्या पोलिस आयुक्तांचे पद हे राज्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या दर्जाचे आहे. त्यामुळे आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना नियममानुसार पायलट कार आणि एस्कॉर्ट कारही देण्यात आली आहे. हिचकी बारमधील डीजेबद्दल माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे त्या झोनचे उपायुक्त, सहायक आयुक्त (एसीपी) किंवा सदर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनाही कार्रवाई करण्यात सांगू शकले असते. परंतु पाटील यांनी थेट आपल्या पथकाला कार्रवाईचे आदेश दिले.
स्वतः पोलिस आयुक्तांच्या पथकाने ही कार्रवाई केल्याने सदर पोलिस ठाण्याचे निरीक्षक, या विभागाचे सहायक पोलिस आयुक्त आणि उपायुक्त हे आतापर्यंत काय करत होते, त्यांना हिचकीमधील गोंगाटाची माहिती नव्हती की, ते जाणीवपूर्वक हिचकीच्या मालकाला मदत करत होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांना संदेश
हिचकी बारवरील कार्रवाईनंतर नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिस दलातील सहकारी अधिकारी, बारमालक आणि चुकीची कामे करणाऱ्यांना कायद्यात राहााल, तर फायद्यात राहाल असा अप्रत्यक्ष संदेश दिला आहे. त्यामुळे पोलिस अधिकारीही धास्तावले आहेत.











