नागपूर : संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन मनпаने पाणी बचत व जलसंवर्धनासाठी सात कलमी कार्यक्रम तयार केला असून नागरिकांनी सुद्धा मनपाच्या या उपायोजनांच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नीता ठाकरे यांनी केले.
शहरातील पाणी टंचाई व घ्यावयाच्या संभाव्य उपायोजनांच्या संदर्भात महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक घेतली. यावेळी उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापति शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेता संजय महाकालकर, आयुक्त डॉ. विपिन इनटकर, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. इनटकर यांनी संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने करावयाच्या उपायोजनांची पीपीटीद्वारे सादरीकरण केले. यात पाणी बचत व जलसंवर्धनासाठी मनपातर्फे करावयाच्या उपायोजनांची माहिती दिली. यात प्रामुख्याने संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने या उपायोजना केल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या आभा पांडे, एमआयएमचे गटनेता शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेता असलम मुल्ला खान, शिवसेनेचे गटनेता गणेश चॅलेवार, बसपच्या गटनेत्या हर्षला जयस्वाल यांनी सूचना केल्या या सूचनांचा विचार करून शहरासाठी सात कलमी कार्यक्रम निश्चित केला आहे.
यावेळी महापौर ठाकरे यांनी प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन केलेल्या उपायोजनांसोबत नागरिकांनी सुद्धा पाण्याचा वापर काटकसरीने करावा. प्रामुख्याने झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याचा वापर अनावश्यकपणे अधिक प्रमाणात होत असल्याच्या निदर्शनास येते. तेथे मीटर देणे तसेच तेथील बेकायदेशीर मीटर अधिकृत करण्याच्या संदर्भात एक धोरण निश्चित करावे, असे निर्देश महापौरानी यावेळी दिले. सर्व घरांना रेन हार्वेस्टिंग अनिवार्य करावे. या धोरणाची प्रशासनाने त्वरित अंमलबजावणी करावी. ज्या घरात व्यवस्था नसेल त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. बांधकामासाठी पिण्याचे पाण्याचा वापर करू नये यांना कुठून पाणी उपलब्ध करून देण्यात येईल याचे अभ्यास करावे. कार वॉशिंग सेंटरला पिण्याचे पाणी मिळणार नाही. त्या सर्व सेंटरच्या संचालकांनी पर्यायी व्यवस्था करावी. या सर्वांना सांडपाण्यावर प्रक्रिया न केलेले पानी दिले जाऊ शकते काय याची चाचपणी आवर्जून करावी असेही सांगितले.
सार्वजनिक विहिरींची स्वच्छता व सौर पंपों की स्थापना करून लघु पाणी पुरवठा योजना आखणे, सांडपाणी प्रक्रिया करून पुनर्वापर, पाणी गळती शोधणे व दुरुस्तीचे कार्य जलद गतिने करणे, पाण्याचे बाष्पीभवन रोखणे, पाणी बचतीचे महत्त्व लोकांना पटवून सांगणे, पाणी गळती कमी करणे, भूजल पुनर्भरण करणे, असा हा सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
७५ कार वॉशिंग सेंटरवर कारवाई
शहरात पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू आहे. यात वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्या ७५ सेंटरवर नोटीस बजावून निबंध लागू करण्यात येणार आहेत. यात जवळपास ३ लाख लिटर पाण्याची बचत होत आहे, असे आयुक्तांनी सांगितले.














