लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे नवे श्रीमंत राजे रघूजीनगर भवनाचे (टाऊन हॉल) अंतिम टप्प्यात आले असून, उद्घाटनानंतर या इमारतीची सुरक्षितता, देखरेख, डागडुजी व सभागृहाच्या कामकाजाबद्दल प्रशासनाने दुसऱ्या महानगरपालिकांचा अभ्यास करून विधी विभागाच्या सहकार्याने एक नियमावली तयार करावी, असे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नव्या टाऊन हॉलचे उद्घाटन डिसेंबर महिन्यात करण्याचे निश्चित झाले असून, या नव्या वास्तूंमध्ये नेमक्या काय सोई सुविधा राहणार आहेत तसेच या इमारतीच्या सुरक्षित, देखरेख कशी राखायची, या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक महापौर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.
यावेळी उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी, सत्ता पक्षनेता नरेंद्र बोरकर, विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मरुगानंथम एम यांच्यासह विविध विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित
सुरक्षेला प्राधान्य
या इमारतीची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी एक्सेस कंट्रोल तसेच आरएफआयडी टॅग या डिजीटल पद्धतीचा वापर केला जाणार आहे. इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी नगरसेवकांना यासाठी आयडी कार्ड दिले जाईल तसेच फेस व थम्ब रिकग्निशनने नगरसेवकांना सभागृहात जाता येईल.
करण्याची आवश्यकता असल्याचे सत्ता पक्षनेता बोरकर यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला काही लेखी सूचना केल्या. या सूचनांवर प्रशासनाने आपले मत व्यक्त करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी सभागृहाचे कामकाजाबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली. सभागृहाचे कामकाज पेपरलेस करण्यात येणार आहे.
नगरसेवकांना डीजीटल प्रणाली हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नगरसेवकांचे होणारे भाषणाची क्लिप कार्यालयातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

















