भविष्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्थेवर देणार भर
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : ब्रिक्स देशांना शाश्वत, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सक्षम अशा परिवहन व्यवस्था निर्माण करण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात शनिवारी आयोजित ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांचे स्वागत केल्यानंतर गडकरी म्हणाले की, ब्रिक्स देशांची सामूहिक ताकद नवलकल्पना, भागीदारी आणि सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक परिवहन व्यवस्थेच्या भविष्याला नवी दिशा देऊ शकते. ही बैठक उदनोन्मुख अर्थव्यवस्थांमधील परिवहन सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे गडकरींनी सांगितले.
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची संकल्पना ‘लवचिकता, नवलकल्पना, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्मिती’ अशी असून ती ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. हा दृष्टिकोन मानव-केंद्रित आणि ‘मानवता सर्वोपरि’ या विचारसरणीला प्रोत्साहन देणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या वेगवान प्रगतीचा उल्लेख परिवहन हे आर्थिक विकासाचा कणा असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले की, भारत रस्ते, रेल्वे, सागरी आणि विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने प्रगत करत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे विकसित केले असून, नियंत्रित प्रवेश असलेल्या द्रुतगती महामार्गांसह बहुआयामी संपर्क व्यवस्थेचा विस्तार करण्यात येत













