लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : व्हिएतनामला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांसोबत एक मोठा अपघात घडला आहे. हनोई येथील भारतीय दूतावासाने माहिती दिली की, शनिवारी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट उलटली. या अपघाताची माहिती देण्यासाठी भारतीय दूतावासाने एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पीडबोट उलटल्याने १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिएतनाममधील फु क्वोकजवळ, होन मे रुट नोई बेटाजवळ बोट उलटली तेव्हा त्यात ३२ भारतीय पर्यटक आणि चार कर्मचारी होते. २१ जणांना वाचवण्यात आले आहे. सर्व २१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनाममध्ये बोट अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि सांगितले की, भारतीय दूतावास आणि इतर भारतीय दूतावास पीडित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहेत. दूतावासाने कळवले आहे की, बाधित कुटुंबांना माहिती आणि मदत देण्यासाठी हो चि मिन्ह शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, ते या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.














