इंडिया आघाडीचे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर
लोकवाहिनी न्यूज नागपूर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी गुरुवारी नागपुरात मोर्चा काढला. महात्मा गांधी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या मोर्चान विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विविध मागण्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवत इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. मराठी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलांक एकत्र आले. त्यानंतर घोषणा देत मोर्चीला सुरुवात करण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आपल्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मोर्चानदरम्यान आंदोलकांनी विविध घोषणा दिल्या. ‘चोर है, चोर है, ज्ञानेश कुमार चोर है’, ‘पहले लडे थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. ‘राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’ आणि ‘आज की आंधी, राहुल गांधी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. घोषणाबाजीमुळे काही काळ आंदोलनस्थळी राजकीय वातावरण तापले होते.
मोर्चान माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार सहभागी झाले होते. नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे तसेच नागपूर ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष अश्विन बैस यांचीही उपस्थिती होती. काँग्रेस नेत्या अर्बंतिका लेकुरवाळे यांनीही मोर्च्यात सहभाग घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्तेही मोर्च्यात सहभागी झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीएम) यांच्या नेत्यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला. इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे मोर्च्याला मोठे स्वरूप प्राप्त झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेबाबतच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.













