राज्याच्या विकासातून देशाच्या विकासाचा मंत्र : नरेंद्र मोदी
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : गेल्या २५ वर्षांपासून सरकारप्रमुख म्हणून काम करताना लोकशाहीच्या दोन शक्तींवरील आपला विश्वास सातत्याने अधिक दृढ झाला आहे, या दोन शक्ती म्हणजे देशातील जनता आणि सहकारी संघराज्यवाद, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. मी नेहमीच राज्याच्या विकासातून देशाच्या विकासाचा मंत्र घेऊन पुढे चाललो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तमिळनाडूच्या दौऱ्यासाठी चेन्नई येथे पोहोचले. त्यांनी सर्वप्रथम चेन्नई मेट्रोने पोरूर बायपास स्टेशन ते पूनामल्ली बायपास स्टेशन असा प्रवास केला आणि त्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास केला. त्यानंतर त्यांनी जलकंडेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. त्यानंतर आयआयटी मद्रास येथील मस्तिष्क केंद्राला भेट दिली. पंतप्रधानांनी १३ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, काही प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आपल्या सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेत विज्ञानातील प्रगती आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पुढे जात आहे. आज त्यांनी तमिळनाडूमध्ये १३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे वाहतूक, उद्योग आणि व्यापाऱ्याला बळ मिळेल, तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
पंतप्रधान म्हणाले की, वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी केवळ रस्ते रुंद करणे पुरेसे नाही, तर आधुनिक शहरांमध्ये सर्वांगीण पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. याच उद्देशाने गेल्या दशकभरात देशातील मेट्रो नेटवर्कचा विस्तार करण्यात आला आहे. २०१४ मध्ये देशातील केवळ (पान ६ वर).











