सामूहिक बाल चित्र प्रकल्प उत्साहात
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : बसोली संस्थेच्या वतीने आयोजित एक दिवसीय सामूहिक बाल चित्र प्रकल्प अंतर्गत १० बालचित्रकारांनी ‘सुवर्ण चौकटीच्या पलीकडचे जग’ या संकल्पनेवर रंग आणि कुंचल्याच्या माध्यमातून आपल्या कल्पनाशक्तीला अभिव्यक्त केले.
पंडित बच्छराज व्यास विद्यालयाच्या सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक प्रकाश एदलाबादकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मुलांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत कला आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याची प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बसोलीचे प्रमुख चंद्रकांत चन्ने यांनी शिबिरामागील संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, ‘सुवर्ण चौकट’ म्हणजे समाजाने आखून दिलेल्या मर्यादा असून, त्या चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची प्रेरणा मुलांना या उपक्रमातून देण्यात येत आहे. कल्पनामय भावविश्वाला मुक्त अभिव्यक्ती देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुलांच्या कल्पना, स्वप्ने आणि या सामाजिक परिवर्तन, तंत्रज्ञान आणि अशा विविध विषयांवर आकर्षक चित्रे साकारली. त्यांच्या चित्रांमधून भविष्याचा आशावादी दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण विचार प्रकर्षाने दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुलांशी संवाद साधत त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि सर्जनशीलतेच्या बळावर भविष्य घडविण्याचा संदेश दिला. मुलांनी पर्यावरण, विज्ञान, आणि यावेळेस व्यक्त करण्यात आले. कला ही केवळ छंद नसून व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे एदलाबादकर म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन मधूरा भड यांनी केले. आयोजनासाठी बसोलीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सहभागी बालमित्रांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम संस्मरणीय असल्याचे मत ठरला.








